मराठी आणि हिंदी एकत्र बुकलेट सोबत →
गर्भावस्था- स्त्री जीवनातील एक अत्यंत नाजूक, तरल तसाच विलक्षण कुतुहलाचा काळ, मात्र गर्भातील बालकाबरोबरचं शाश्वत, सुंदर नात, गर्भधारणेच्या क्षणी सुरु होत - जन्माच्या क्षणी नाही अस्तित्वाच्या पहिल्या क्षणापासून, गर्भाला स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं; त्याच्या पेशी – पेशीला जाणीव असते, भावना असते आणि म्हणूनच गर्भ संवेदनशील असतो गर्भासंगीताच्या माध्यमातून हे संवेदनशील व्यक्तित्व त्याच्या मातेसोबत, कुटुंबाबरोबर आणि समाजाशी घट्टपणे जोडले जाते. यामध्ये गर्भवती स्त्रीने ऐकण्यासाठी तीन सीडीज बनविल्या आहे. प्रत्येक तिमाहीला (ट्रायमेस्टर) एक , याप्रमाणे गर्भाच्या बदलत्या गरजांची दखल घेत, हे गर्भसंगीत बनविले आहे.
गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत वाढत्या गर्भाच्या गरजा भागवण्यासाठी, स्त्रीच्या शरीरात असंख्य बदल घडतात. हार्मोन्सच्या पातळीवर लाक्षणीय वाढ होते. या काळात मनाची सकारात्मक स्थिती कायम ठेवणे तितकेच आवश्यक असते. सीडी त्या बाळाशी - त्याच्या जन्माआधीच – विश्वासच नातं जोडण्याचं उत्कृष्ट साधन आहे.
गर्भोपनिषद, गायत्री मंत्र, येथपासून ते वेदांमधील सामाजिक एकता सांगणाऱ्या ऋचा यांचे सुरेल गायन या सीडीमध्ये ऐकण्यास मिळेल. सोबत दिलेल्या रंगीत पुस्तकात संस्कृतमधील श्लोक, मंत्र व त्याचा अर्थ दिलेला आहे. अर्थ समजून श्लोक, ऋचा ऐकाव्यात.
संशोधन, संकल्पना व निर्मिती: श्री. गजानन केळकर,
संगीत संकल्पना: सौ. अंजली मालकर,
संगीतकार: श्री. किशोर कुलकर्णी,
निवेदन: श्रीम- प्रज्ञा केळकर,
गायत्री मंत्र: सुधीर फडके,
गर्भोपनिषद: श्री. दिनकर जोशी,
गायन: श्लोक- श्री किशोर कुलकर्णी व समूह शास्त्रीय- सौ. अंजली मालकर,
साथ सांगत: पखवाज- श्री. प्रसाद जोशी,
तबला- श्री. विवेक भालेराव,
हार्मोनियम- श्री. मिलिंद गुणे,
बासरी- श्री. संदीप कुलकर्णी,
संतूर- श्री. दिलीप काळे,
सतार- सौ संध्या फडके,
संगीत संयोजन- श्री. मिलिंद गुणे
ध्वनि मुद्रण- श्री ओंकार केळकर, (शिवरंजनी) पुणे.