गर्भसंगीत - जुने

$80.00 / ₹80.00

Description


आपल्या बाळासाठी तो पोटात असताना त्याच्या आईवडिलांनी ऐकलेले, गुणगुणलेले, गायलेले, अनुभवलेले गीत, म्हणजेच ‘गर्भसंगीत’.

संगीतामुळे गर्भावर कसा परिणाम होतो याची नोंद, अनेक शास्त्रज्ञांनी प्रयोगाद्वारे नोंदवलेली आहे. त्याला आईच्या पोटातील व आजूबाजूच्या वातावरणातील आवाज ऐकू येतात, व त्याला तो प्रतिसादही देतो.

आई - वडिलांनी हे संगीत गर्भधारणेच्या पहिल्या दिवसापासून अवश्य ऐकावे. त्यामुळे त्यांच्या मनावरचे ताण हलके होण्यास मदत होईल.

या सर्व शास्त्रीय पार्श्वभूमीवर, भारतीय शास्त्रीय संगीत हे अतिशय प्रभावी ठरू शकेल. कारण भारतीय संगीताचा पाया ‘शास्त्रीय’ आहे. त्याला हजारो वर्षांची परंपरा आहे. शास्त्रीय संगीताची जननी म्हणून वेदाकडे पहिले जाते. चार वेदांपैकी सामवेदाकडे याचे पालकत्व जाते. सांगिताला सामवेदाचा वारसा आहे. वेद हे अपौरुषेय मानले गेले आहेत. असे हे दैवी संगीत येणाऱ्या जीवाला निश्चितच आकार देईल.

‘मंत्रशक्ती’ ही एक भारतीयांना लाभलेली विशेष देणगी आहे. ‘मन’ ठिकाण्यावर ठेवतो तो मंत्र’, अशी मंत्राची व्याख्या आहे. मंत्राच्या अनेक शक्तींपैकी मंत्राचा ‘अर्थ’ ही एक प्रभावी शक्ती आहे. ‘गायत्री मंत्र’ तर मंत्रांचा राजा. आपल्या बुध्दिला सतप्रेरणा मागणाऱ्या या मंत्राचा घोष येणाऱ्या जीवाला सुबुध्दि देईल. सुविख्यात संगीतकार व गायक दिवंगत श्री. सुधीर फडके यांनी आपल्या सुरेल आवाजा मध्ये व लयीमध्ये, दोन वेगवेगळ्या रागांमध्ये गायत्री मंत्र गायला आहे.