कार्टून्स आणि गोष्टी मुलांना आवडतात. गोष्टी मुलांच्या मनावर खोलवर परिणाम करत असतात. . मुलांवर योग्य संस्कार करण्याचे, त्यांच्या भावविश्वात शिरून त्यांच्यात मानसिक, भावनिक, बौद्धिक परिणाम साधण्याचे उत्कृष्ट माध्यम म्हणून आपण गोष्टींकडे बघू शकतो. ह्या गोष्टी संस्कार, नीती, चातुर्य, धैर्य देणाऱ्या रंजक व बोधक कथा आहेत. मुलांना आवडेल असं उत्कृष्ट अनिमेशन, उत्कृष्ट पण सोपी उद्बोधक भाषाशैली, सुंदर संगीताने निर्माण केलेली वातावरण निर्मिती आणि मुख्य म्हणजे त्यातला आशय मुलांच्या भावविश्वात शिरून त्यांना मार्गदर्शक ठरेल.