कार्टून्स आणि गोष्टी मुलांना आवडतात. गोष्टी मुलांच्या मनावर खोलवर परिणाम करत असतात. . मुलांवर योग्य संस्कार करण्याचे, त्यांच्या भावविश्वात शिरून त्यांच्यात मानसिक, भावनिक, बौद्धिक परिणाम साधण्याचे उत्कृष्ट माध्यम म्हणून आपण गोष्टींकडे बघू शकतो. ह्या गोष्टी संस्कार, नीती, चातुर्य, धैर्य देणाऱ्या रंजक व बोधक कथा आहेत. मुलांना आवडेल असं उत्कृष्ट अनिमेशन, उत्कृष्ट पण सोपी उद्बोधक भाषाशैली, सुंदर संगीताने निर्माण केलेली वातावरण निर्मिती आणि मुख्य म्हणजे त्यातला आशय मुलांच्या भावविश्वात शिरून त्यांना मार्गदर्शक ठरेल.
निर्मिती प्रमुख- श्री. प्रमोदभाई शिंदे, लेखन, पटकथा, दिग्दर्शन- मयूर चंदने, अॅनिमेशन दिग्दर्शन- अशोक नजने, शीर्षक गीत- प्रविण दवणे, संगीत/ पार्श्वसंगीत- आशिष केसकर, शीर्षक गीत गायक- हृषीकेश रानडे आणि कोरस
कथा निवेदन – डॉ.अमित त्रिभुवन
कथा सादरीकरण – राहुल सोलापूरकर, आशिष केसकर, भाग्यश्री केसकर, चंद्रशेखर रणभोर, आशिष पडवळ, मयूर चंदणे, संदीप पाटील, सौरभ निलेगावकर, मंथन महाडिक, अदिती केसकर, अजिंक्य कुलकर्णी, चिन्मय पटवर्धन, शर्व सोवनी, सोहम पणशीकर, ध्वनिमुद्रण - ओरायन स्टुडीओ, पुणे
विशेष आभार- सुनील जावळे
अॅनिमेशन प्रॉडक्शन- शिवम मल्टिमिडीया