प्रार्थना म्हणजे सद्विचारांचे चिंतन. प्रार्थना हे संस्काराचे उत्तम माध्यम आहे. व्यक्तितले चांगले गुण वाढविणे आणि दोष कमी करणे म्हणजे संस्कार. लहान मोठ्या सर्वांनाच संस्काराची आवश्यकता असते. सायंकाळच्या शुभवेळी स्तोत्रपठणाने मन प्रसन्न होते. दिवसभराच्या दगदगीमुळे अस्वस्थ झालेले मन शांत होते. म्हणूनच आपल्या व्यस्त वेळापत्रकातून सायंप्रार्थनेसाठी थोडा वेळ काढावा. पूज्य स्वामी विज्ञानानंद यांनी श्लोक, स्तोत्र, मंत्र, नामजप यांचा उपयोग आधुनिक शास्त्रांच्या माध्यमातून विश्लेषित केला आहे. त्यांच्या संशोधनावर लहान मोठ्या सर्वांसाठी स्तोत्र, श्लोक आणि मंत्राचे सादरीकरण मनशक्ती प्रयोगकेंद्राने केले आहे. शरीरशास्त्राप्रमाणे प्रत्येक सेकंदाला साडेबारा कोटी पेशींचा नाश होतो. नियमित प्रार्थनेने पेशी सुसंस्कारित होऊन १८६ दिवसात व्यक्तींमध्ये अनुकूल बदल होतो, एकाग्रता, संस्कार, परीक्षायश, ताणमुक्ती, रोगमुक्ती, वास्तुशुद्धी, कुटुंबसुख मिळवण्यासाठी या श्लोकांचे श्रवण आणि पाठांतर नित्यनेमाने करावे. त्याचप्रमाणे प्रार्थनेचे विचार आचरणात आणावेत आणि नि:स्वार्थ कर्माची त्याला जोड द्यावी.
निर्मिती व प्रकल्प प्रमुख- प्रमोदभाई शिंदे
निवेदन लेखन- स्वाती आलुरकर
संकल्पना व निर्मिती व्यवस्था- मयूर चंदने
ग्राफिक्स- अनुराग सावंत
संगीत व संगीत संयोजन- नरेंद्र भिडे
निवेदन- मंजिरी जोशी, राजेश देशमुख, राहुल सोलापूरकर
गायक वृंद- प्रमोद रानडे, सचिन इंगळे, आदित्य आठल्ये, हेमंत वाळुंजकर, हृषीकेश केळकर, संदीप उबाळे, कीर्ती फाटक, भाग्यश्री अभ्यंकर, आसावरी गोडबोले, कल्याणी आमलेक, दर्शना नांदूरकर
बासरी- संदीप कुलकर्णी, तबला- पखवाज- डॉ. राजेंद्र दूरकर, ‘भीमरूपी’ तळ संयोजन- हृषीकेश दातार, सतार- प्रसाद गोंदकर, गिटार/व्हायब्रोफोन- ज्ञानेश देव, ध्वनीमुद्रण- अर्चना म्हसवडे(DAWn Creation Pune)