‘कुंडलिनी योग’ ही ध्यानशक्ती घेण्याची अत्यंत प्रभावी पध्दत आहे. या पध्दतीचे मूळ हजारो वर्षांपूर्वीचे आहे. शरीराशी संवाद साधत कुंडलिनी शक्ती जाणण्याची एक अपूर्व ध्यान पध्दत ‘पू. स्वामी विज्ञानानंद’ यांनी सुचवलेली आहे. या ऑडीओच्या माध्यमातून आपण ती अनुभवणार आहात..शरीराशी संवाद - हे ध्यान म्हणजे शरीरातल्या पेशींशी संवाद आहे. शरीरात कोटयावधि, अब्ज्यावधी पेशी आहेत. त्या जिवंत आहेत. आपल्या अतिरिक्त स्वार्थामुळे त्या दुखावल्या जातात. मग त्या रोग किंवा असुख ह्या माध्यमातून प्रतिक्रिया करतात. त्यांच्याशी संवाद साधून त्यांना वळवून घेता येते.
ह्या ध्यान पद्धतीमध्ये दोन प्रकार दिले आहेत.
१. विवाहितांसाठी; ( ट्रॅक - २)
२. अविवाहित किंवा ब्राम्हचार्यांसाठी ( ट्रॅक - ३)
हे गायडेड ध्यान म्हणजे त्यांच्याशी षड्चक्रांच्या माध्यमातून संवाद साधणारे व एक अत्युच्च अनुभव देणारे आहे.शांती, एकाग्रता, कुंडलिनीची अनुभूती, आत्मशु्द्धि तसेच व्यवहार शुद्धि साधणारी एक अपूर्व ध्यान पध्दत आहे.