मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या ‘जन्मपूर्व संस्कार प्रयोग’ चा लाभ, गेल्या पंचेचाळीस वर्षात, हजारो जोडप्यांनी घेतला आहे. त्यातून एक तेजस्वी पिढी जन्माला येत आहे. मुख्यत: मानसिक पातळीवर होणाऱ्या या प्रयोगांना, ‘मनशक्ती’ने आता योगशास्त्राची जोड द्यायचे ठरविले आहे. सध्या योगशास्त्रात आघाडीवर असलेली, बंगलोरची ‘स्वामी विवेकानंद अनुसंधान संस्था’ ही बहुतेकांना परिचित असेल त्याचे प्रमुख व योगतज्ज्ञ डॉ. एच. आर. नागेंद्र (बी. ई. पीएच. डी) व त्याच्या भगिनी डॉ. नागरत्न (एम. डी. एम. आर. सी. पी.) यांच्या सहकार्याने, ‘मनशक्ती’ ने खास मराठी भाषिकांसाठी ‘गरोदरपणातील योगासने’ सादर केली आहेत.
आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी, नियमित योगासने करणं आवश्यक आहे. विशेषत: गरोदरपणात, या योगासनांना एक वेगळं महत्त्व आहे.
आईच्या पोटात गर्भ जसा वाढत जातो, तसं तिचं शरीरही वाढत जातं, काहीस स्थूल होत जातं. अशावेळी विशिष्ट योगासनांद्वारे, स्त्री ही क्रियाशील राहू शकते. व त्याचा फायदा तिला पुढे प्रसुतीवेदना सुसह्य होण्यासाठी आणि सुलभ प्रसुतीसाठी होतो. तसचं पाठदुखी, बद्धकोष्ट, थकवा, सूज इत्यादी गरोदरपणातील तात्कालिक त्रासही कमी होण्यासाठी, त्याचा उपयोग होतो.
संकलक- श्री. गजानन केळकर
विशेष सहकार्य- स्वामी विवेकानंद यो अनुसंधान संस्था, बंगलोर